न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. ऑगस्ट. २०२०):- आरोपी यांनी फिर्यादी व त्याचे मामा यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करुन मे. खारोळे पाटील मैन्युफ्रेंक्चरींग इंडस्ट्रीज ओपीसी प्रा.लि. धानोरे, खेड या कंपनीत तसेच स्टीलनेटिक इंडस्ट्रीज प्रा.लि कंपनी सुरु केली. यात फिर्यादी व त्यांचे मामा यांना समान भागीदार करुन विकसनासाठी त्यांच्याकडून ७७ लाख ७० हजार ५४६ रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
फिर्यादी यांनी रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना आरोपींनी कुठलाही मोबदला न दिला नाही. याविषयी फिर्यादींनी आरोपीला विचारणा केली असता त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले. ‘ तुम्हाला तुमची गुंतवलेली रक्कम परत देतो. तुमची भागीदारी काढून घ्या’ असे सांगून प्रत्यक्षात फिर्यादींना पैसे दिले नाही. अशाप्रकारे आरोपींनी विश्वासघात करुन फसवणूक केली. तसेच फिर्यादी व आरोपी यांचे एका बँकेत जॉईट अकाऊंट होते. त्या संबंधित बकेच्या चेकबुकवर खोटी सही करुन ती बँकेत खरी भासवून आरोपीने ‘ सिंगल पर्सन सिग्नेचर अथॉरिटी ‘ असलेल्या एका बँकेतील अकाऊटवर पैसे ट्रान्सफर केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
अविनाश सुधाकर थिटे (वय २९, रा. पिंपळेगुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आळंदी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल रमेश खारोळे व अर्चना अमोल खारोळे (दोघेही रा. च-होली खुर्द, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.











