न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. ऑगस्ट. २०२०) :- शहरात कोरोनाबधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिकेकडून कोरोना रूग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय सुविधा तसेच, उपाययोजना केल्या जात आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. परिणामी, सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पातील वैद्यकीय विभागासाठी केलेली तरतुद कमी पडत आहे. त्यामुळे २५ कोटी २० लाखांच्या तसंच वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या रविवार (दि. १६) पर्यंत ३५ हजारांच्या पुढे गेली आहे. त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वैद्यकीय विभागासाठी केलेली तरतूद कमी पडत आहे. त्यामुळे इतर ठिकाणचा निधी या विभागाकडे वळविला आहे. विविध रूग्णालय व दवाखान्यात मानधनावर डॉक्टर व पॅरॉमेडिकल स्टाफ भरणा, कोविड केअर सेंटर व रूग्णालय उभारणे, रूग्णांना जेवण व नाश्ता पुरविणे आदींमुळे पालिकेचा खर्च वाढला आहे. त्यामुळे २५ कोटी २० लाखांचा निधी या खर्चासाठी वळविण्यात आला आहे, अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.