- ऑगस्ट अखेरपर्यंत ५५ ते ६० हजार कोरोनाग्रस्त तर, सप्टेंबरपासून रुग्णसंख्या आटोक्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. ऑगस्ट. २०२०) :- शहरातील करोना रुग्णांची सख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. सध्या २२ दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. तर शहरात सद्यःस्थितीत ३४ हजार रुग्ण आहेत. त्यानुसार २२ दिवसांनी रुग्ण वाढ दुप्पट होतील. तसेच सप्टेंबरपासून रुग्णसंख्या आटोक्यात येईल, असा अंदाज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला आहे.
आयुक्त हर्डीकर म्हणाले, जुलै अखेरपर्यंत शहरातील बाधित रुग्णांची संख्या २१ हजार होती. आता ३४ हजार आहे. २२ ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या ४० हजार होईल. कदाचित संक्रमणाच्या वेगामध्ये वाढही होऊ शकते.
शहरातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी पूर्वी १२ ते १४ दिवसांचा होता आता त्यामध्ये वाढ झाली असून रुग्ण दुपटीचा कालावधी २० ते २२ दिवसांचा झाला आहे. त्यानुसार आजपासून २२ दिवसांनी शहरातील रुग्णसख्या ६४ हजार होईल. तर ऑगस्ट अखरपर्यंत रुग्णसख्या ५५ ते ६० हजार असेल. तसेच सप्टेंबर महिन्यापासून रुग्णसंख्या हळूहळू कमी होईल, असा अंदाज आयुक्तांनी वर्तविला आहे.














