न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या विकासकामांची गती वाढवावी. भविष्यात विकासकामांचे नवीन काही प्रस्ताव असल्यास ते सादर करण्यात यावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना केली.
प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर नुकतीच सौरभ राव यांनी प्राधिकरण कार्यालयास भेट दिली. तसेच, प्राधिकरणाच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी, उप – मुख्य कार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील, मनीषा कुंभार, अभिषेक देशमुख, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर, मुख्य नगररचनाकार भुणगे व अन्य अधिकारी उपस्थित होते. पेठ क्रमांक १२ येथे सुरू असलेल्या गृहप्रकल्पाला त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली.














