न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. ऑगस्ट. २०२०) :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवरील मैदानात करोनाचे ८०० ऑक्सिजन बेड क्षमतेचे जम्बो रुणालय युद्ध पातळीवर उभे केले जात आहे. त्यासाठी महापालिकेने १८ कोटी ५० लाख रुपये खर्च केले आहेत.
शहरात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्या उपचारासाठी पालिका व खासगी रुणालय अपुरे पडत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने मगर स्टेडियममध्ये जम्बो रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान नेहरूनगर येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवून कोविड सेंटरचे काम जलद गतीने करण्यात यावे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेटीदरम्यान प्रशासनाला केल्या आहेत.














