न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. ऑगस्ट. २०२०) :- डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाली आहे.
डॉ. राजेश देशमुख हे सन २००८ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून देखील काम पाहिले आहे. राम यांची पीएमओत नियुक्ती झाल्याने पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. दरम्यान, आज (सोमवार) राज्य सरकारने पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.














