न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- भोसरी येथील एका सोसायटीमध्ये एक चोरटा चोरीसाठी गेला होता. हा प्रकार तिथल्या रहिवाशांच्या लक्षात आला. नागरिकांनी त्याला बांधून ठेवले आणि मारहाण केली. यामध्ये त्या चोरट्याचा मृत्यू झाला.
त्यामुळे नागरिकांमध्येच घाबराट पसरली असून कायदा हातात घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.














