न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रंगनाथ फुगे यांचे आज (दि. १८) कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांचे वय ८० होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
फुगेवाडी प्रभागातून रंगनाथ फुगे काँग्रेसच्या चिन्हावर पिंपरी-चिंचवड पालिकेत निवडून आले होते. तीनवेळा त्यांनी फुगेवाडीचे प्रतिनिधित्व केले. फुगे यांना चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.














