न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे स्वीय सहायक (पीए) व शिपाई हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी स्वत: ला होम आयसोलेट करून घेतले आहे. आयुक्तांनी स्वत: ला ४ ते ५ दिवस होम आयसोलेट करून घेतले आहे.
त्यामुळे ते सोमवारी (दि. १७) ते पालिकेते आले नाहीत. त्यांचे दालन निर्जंतुक करून सील करण्यात आले आहे. आता ते नियमित कामकाज घरातून करीत आहेत. महापालिकेमध्ये आजपर्यंत १३० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. तर आता आयुक्तांच्या कक्षामध्येही करोनाने एन्ट्री केली आहे.














