न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या पंतप्रधान आवास योजनेतील च-होली, रावेत, बो-हाडेवाडी या तीन गृहप्रकल्पांसाठी सोमवारी (दि. १७) पहिल्याच दिवशी ४१९ जणांनी प्रतिसाद दिला.
त्यांनी ऑनलाईन माध्यमातून नोंदणी केली. या ३ प्रकल्पातील ३२२ चौरस फूट आकारांच्या ३ हजार ६६४ सदनिकांसाठी अर्ज स्वीकृतीस सोमवारपासून महापालिकेने सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी ४१९ जणांची अर्ज भरून त्यास प्रतिसाद दिला आहे. अर्ज स्वीकृती १७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे, अशी माहिती झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त सुनील अलमलेकर यांनी दिली.














