न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन व कोविड केअर सेंटरमधील रूग्णांच्या सुरक्षेसाठी २२० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या ५ महिन्यांच्या मानधनासाठी ३ कोटी ११ लाख ७५ हजार ५९५ खर्च करण्यात आला आहे.
पालिकेने शहरात १५ पेक्षा अधिक ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहेत. त्यातील रूग्णांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाकडून पालिकेने २२० होमगार्ड घेतले होते.
त्यांना प्रतिदिन ९८८ रूपये २५ रूपये मानधन (कर्तव्यभत्ता) दिले जाते. त्याप्रमाणे २३ मार्च ते २८ ऑगस्ट असा ५ महिन्यांसाठी ३ कोटी ११ लाख ७५ हजार मानधन अदा करण्यात आले आहे. या पुढेही हे होमगार्ड सुरक्षेच्या दृष्टीने नेमले जाणार आहेत.














