न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- करोनाबाधित रुग्णांवर केल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचारांची शहरातील खासगी रग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात आहेत. याबाबत राज्य सरकारकडे अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने, महापालिका प्रशासनाने या रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या बिलांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार चौकशी व तपासणी समितीचे कामकाज याच विषयाशी संबंधित आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाने पुढाकार घेत, महापालिका स्तरावर हीयंत्रणा कार्यान्वित केली आहे. दरम्यान, काही खासगी रुग्णालयांमध्ये केल्या जाणाऱ्या करोनाबाधितांवरील उपचारापोटी लाखो रुपयांची बिले आकरली जात आहेत.
त्यामुळे सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयातील बिले परवडेनाशी झाली आहेत. लाखो रुपयांची बिले आकारल्याच्या शेकडो तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. सरकारकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांनी भारतीय राजस्व सेवेतील आयकर विभागाचे सह आयुक्त एन. अशोक बाबू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.














