न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- कोरोना महामारीच्या काळात रुग्णवाहिकेची नित्यंत गरज भासत आहे. ही गरज ओळखून आमदार निधीतून आमदार लक्ष्मण जगताप यांनी औंध जिल्हा रुग्णालयास रुग्णवाहिका भेट दिली आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमदार जगताप यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. बी. एल. काकणे, डॉ. शर्मिला गायकवाड, डॉ. संतोष देशपांडे, बालाजी वाडजे, संदीप बर्डे, संजय मराठे आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयाकडे अत्याधुनिक उपकरणांसह असलेली एकमेव रुग्णवाहिका आहे. रुग्णांना तातडीची सेवा मिळण्यास मदत होणार आहे.














