न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हें) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील हॉकर्सधारकांवर कारवाईचे सत्र चालू आहे. या सर्व पात्र हॉकर्स धारकांचे सुरुवातीस पुनर्वसन करावे, मगच या हॉकर्सधारकांवर कारवाई करण्याची मागणी, शिवशाही व्यापारीसंघाच्यावतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड शहरात दाखल झालेल्या हॉकर्स धारकांना उपजिवीकेपोटी छोटे छोटे व्यवसाय करावे लागतात. अशा वेळी महापालिकेने त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असताना, त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचा उद्योग महानगरपालिका करीत आहे.
महानगरपालिकेने हा उद्योग बंद न केल्यास, आगामी काळात हॉकर्सधारकांच्या वतीने शिवशाही व्यापारी संघटना मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचे, शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी सांगितले आहे.
















