न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. ऑगस्ट. २०२०) :- पिस्तुल बाळगणाऱ्या एका आरोपीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून दोन गावठी पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
पोलीस तपासात १२ हजार रुपयात दोन पिस्तुलं देत असल्याने आरोपीने खरेदी केल्याचं निष्पन्न झाले आहे. मंगेश सुरेश जाधव (वय- २१ रा. ओटा स्कीम निगडी) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश येथील एक व्यक्ती आपल्या मूळ गावी जाणार होता, त्याच्याकडे असलेले दोन गावठी पिस्तुलं आणि सहा जिवंत काडतुसे त्याने आरोपी मंगेश ला २० हजारात विकण्याचा सौदा झाला. मात्र,अखेर १२ हजारात पिस्तुल परवडतात अस आरोपीने त्या व्यक्तीला सांगितले आणि अवघ्या १२ हजारांत दोन पिस्तुलं आणि सहा जिवंत काडतुसे विकत घेतली.











