न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट. २०२०) :- सार्वजनिक रस्त्यावर उभा केलेला पाच लाख रुपये किंमतीचा टेम्पो चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना चिखलीतील कुदळवाडी परिसरात १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
संदीप प्रकाश मोरे (वय ३७, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी रविवारी (दि. १६) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी संदीप यांनी त्यांचा एमएच – १४ – जीडी – ९०४५ हा पाच लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो १२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कुदळवाडी चिखली येथे चिखली-पिंपरी रोडच्या कडेला पार्क केला होता. चोरट्यांनी त्यांचा टेम्पो चोरून नेला. हा प्रकार १३ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आला.











