न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट २०२०) :- ऑटो क्लटर व बालनगरी येथील कोविड सेंटर लवकरात लवकर पुर्ण करणेत यावे, शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांना आय.सी.यु. व व्हेंटीलेटरची सुविधा पुरविण्यात यावी, या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर मनसेने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.
यावेळी मनसेचे राजू साळवे, विशाल मानकरी, बाळा दानवले, मयुर चिंचवडे, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, रवी जाधव आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व मृत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या रोज २० ते २५ आहे. शहरातील सद्याची स्थिती पाहाता सरकारी व खाजगी हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी फुल आहेत. यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब लोकांना आर्थिक खर्च परवडत नसल्यामुळे किंवा अशा लोकांना शहरामध्ये आयसीयु व व्हेंटीलेटरची सुविधा मिळत नसल्यामुळे कोरोना रुग्ण दगावत आहेत. शहरामध्ये आत्तापर्यंत ६८५ कोरोना रुग्ण मृत झालेले आहेत. ऑटो क्लटर व बालनगरी येथील कोविड सेंटर लवकरात लवकर पुर्ण करणेत यावे, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे आंदोलनादरम्यान केली.














