न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत २३ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून साठ्यात १.८६ टक्यांनी वाढ झाली आहे.
तर, १ जूनपासून १२६६ मिली मीटर पाऊस झाला असून ४३.५८ टक्यांनी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. एकूण ७८.८७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने मावळ, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची पाण्याची चिंता संपली आहे.














