न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. ऑगस्ट. २०२०) :- झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) च्या नावाखाली वाकड म्हातोबानगर येथील झोपडपट्टीधारकांवर अन्याय केला जात आहे. करारनामा करूनही ६ ते ७ वर्षे झाली तरी बांधकाम व्यावसायिक बघू, करू असे म्हणत. पात्र – अपात्र या अटींवर झोपडपट्टीधारकांना वेठीस धरत आहेत.
पुनर्वसन सुरू असल्याचे दाखविले जात असल्यामुळे सार्वजनिक आरोग्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत त्वरीत कार्यवाही न झाल्यास मास्क न वापरता महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते पखाले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
वाकड – म्हातोबानगर येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन २०१२-१३ या वर्षात विकासकाने झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन आहे त्या जागेवर २ ते ३ वर्षात करू, असे सांगितले होते. तसेच पात्र-अपात्र या सर्वांना सरसकट घरे देऊ, असा शब्द दिला होता. त्यामुळे सर्व झोपडपट्टीधारकांनी आपले आरोग्य व राहणीमान सुधारेल म्हणून करारनामा करून दिला. परंतु आज ६ ते ७ वर्षे होऊनही झोपडपट्टीधारकांना वेठीस धरले जात आहे. याबाबत कार्यवाही करावी अन्यथा महापालिकेवर महिला, पुरुष मास्क न लावता मोर्चा काढतील, असा इशारा दिला आहे.














