रणबीर कपूर व आलिया भट्टच्या नात्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये बऱ्याच दिवसापासून रंगल्या आहेत. ते दोघे त्यांच्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. पण याबाबत आत्तापर्यंत आलिया व रणबीरने कोणताही खूलासा केला नव्हता. आलियाने एका माध्यमाशी बोलताना तिच्या नात्याबद्दलचे मौन सोडले आहे.
आलिया व रणबीर नेहमीच एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. ते दोघे एकमेकांच्या कुटुंबीयासोबतही वेळ घालवताना बरेचदा कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा त्यांच्या लग्नापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. अशातच एका माध्यमाशी आलियाने बोलताना सांगितले आहे की, ती सिंगल नसल्यामुळे रणबीरसोबतच्या तिच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखेच आहे. तिने याआधीही एका मुलाखतीत सांगितले होते की, ३० वर्षांची होण्यापुर्वी ती लग्नाच्या बेडीत अडकेल. यावरून असेच म्हणता येईल की, दीपिका व रणवीर सिंगनंतर आलिया व रणबीर कपूरही लग्नाच्या बेडीत लवकरच अडकतील.
आलियाने सोडले मौन.


















