‘लॅक्मे फॅशन वीक’च्या महाअंतिम सोहळ्यातठी करिना कपूर-खानने आपल्या अदांनी उपस्थितांची मने जिंकली. तिच्या रॅम्पवॉकसाठी डिझायनर मोनिशा जयसिंगने खास ड्रेस डिझाईन केला होता.लॅक्मेच्या कॉस्मॅटिक प्रॉडक्टसची करिना ही ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर असल्यामुळे तिचे या महाअंतिम सोहळ्यात रॅम्पवॉक अधिक विशेष होते. ती यावेळी जयसिंगने डिझाईन केलेल्या विविध रंगी गाऊनमध्ये रॅम्पवॉक करताना दिसली. हा ड्रेसही लक्ष आकर्षित करून घेणारा होता.
जवळपास ९० डिझायनरचा २२ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या महोत्सवात समावेश होता. करिनाशिवाय करण जोहर, लारा दत्ता, श्वेता नंदा बच्चन हे बॉलिवूड कलाकारही तेथे उपस्थित होते. पायल सिंघल, अब्राहम आणि ठाकूर, राजेश प्रताप सिंग अशा अनेक डिझायनरने आपल्या लेटेस्ट क्लेकशनचे यावेळी प्रदर्शन केले.
बेबो आली रॅम्पवर केला मनमोहक वॉक.


















