न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. ऑगस्ट. २०२०) :- महापालिकेद्वारे प्रत्येक प्रभागात विसर्जनासाठीच्या गणेशमूर्तीचे संकलन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात दोन फिरती वाहने ठेवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
घरात गणपती विसर्जनासाठी अडचणी येणाऱ्या नागरिकांनी त्यांचे गणपती व्हॅनमध्ये जमा करावेत. त्याचप्रमाणे नागरिकांची मागणी वाढल्यास व्हॅनची संख्या वाढविण्यात येईल. शहराच्या प्रत्येक प्रभागात गणेशमूर्तीचे संकलन करण्यासाठी दोन व्हॅन ठेवण्यात येणार असल्याची माहिती स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांनी दिली.















