न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या चाकण वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष झेंडे यांचे कोरोनामुळे रविवारी (दि. ३०) निधन झाले. पिंपरी – चिंचवड शहर पोलीस दलातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.
संतोष झेंडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला होता. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. संतोष झेडे सुरुवातीला मुंबई पोलीस दलात कार्यरत होते.
त्यानंतर त्यांनी पुणे शहर, पुणे वाहतूक विभाग, पिंपरी, एमआयडीसी भोसरी येथे सेवा बजावली. पूर्वीच्या गंभीर व्याधी व आजार असलेल्या पोलिसांनी कोरोनावर सहज मात केल्याचे दिसून येते. मात्र, झेंडे यांच्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.














