न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- पिंपळे निलख येथे २० दिवसांपूर्वी १४ रुग्ण होते. सद्यस्थितीत १४१ रुग्ण आहेत म्हणजेच २० दिवसांमध्ये तब्बल १२७ रुग्ण वाढले आहेत. पिंपले निळख कोरोनाचा हॉटस्पॉट होत चालला आहे.
पालिका प्रशासनाने १३ ऑगस्ट २०२० पासून पिंपळेनिळख परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. पण त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. नागरिक रस्त्याला लावलेले बॅरिकेट बाजूला करन ये-जा करत होते. पोलीस बंदोबस्त नसल्याने बाहेरील नागरिक फेरीवाले, भाजी विक्रेते फिरतात. पिंपळे निलख व विशाल नगरची मिळून जवळजवळ ८०००० लोकसंख्या आहे. येथे कोरोना आणखी पसरल्यास परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाईल.
त्यामुळे पिंपळेनिलख परिसरात आठ दिवसांचा कडक लॉकडाउन करावा. भाजीवाले, फेरीवाले यांना अटकाव करावा. येथील नोकरदार वर्गाला बाहेर जाण्यास प्रतिबंध करावा. लॉकडाऊन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे पालिका प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, पालिका आयुक्त यांच्याकडे ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.














