न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- समन्यायी पाणी वाटप आणि अपूऱ्या पाणीपुवठ्यावर पर्याय शोधणे, गळती, पाणी चोरी रोखण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मागील वर्षी नोव्हेंबर २०१९ रोजी एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. तो आजपर्यंत कायम ठेवला आहे.
सध्या पवना धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आणखी दिवसाआड पाणी कपातीस सामोरे जावे लागणार आहे. योग्य पाणीसाठासुद्धा उपलब्ध असताना देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहरात गंभीर बनला आहे.
‘‘पिंपरी – चिंचवडची लोकसंख्या आजमितीला २७ लाखांच्या आसपास आहे. त्यासाठी पवना धरणातून दररोज ५०० दलघमी पाणी उपसा केला जातो. त्यापैकी ३८ ते ४० पाण्याची गळती होते. शहरात एक लाख ५० हजार नळजोड आहेत. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आजमितीला ३० ते ४० एमएलडी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. समन्यायी पाणीवाटपासाठी जोपर्यंत अतिरिक्त पाणी उपलब्ध होत नाही. तोपर्यंत पाणी पुरवठा आहे तसाच राहणार आहे’, अशी माहिती पिं. चिं. महापालिका आयुक्तांनी दिली आहे.














