न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या एल.जी.एस. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. देशात पहिल्या १० क्रमांकामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ७ कर्मचार्यांचा समावेश आहे.
त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभाग्रहाध्ये या ७ कर्मचार्यांचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कार झालेल्या कर्मचार्यांमध्ये किशोर साबळे (प्रथम), मंगल बरमाडे (द्वितीय), आकाश चव्हाण (चौथा), जया जाधव (पाचवा), रवी लखन (सातवा), सविता महारनोर (नववा) आणि अनुष्का अधिकारी (दहावा) यांचा समावेश आहे. सत्कार प्रसंगी कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे व कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.














