न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. सप्टेंबर. २०२०) :- पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगाने पदवीधरांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी पिंपरी – चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत ५० हजार अर्ज भरण्याचे उद्दिष्ट शहराध्यक्ष आ . महेश लांडगे यांनी सरचिटणीस, सहा मंडलाध्यक्ष यांच्या बैठकीत दिले.
मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, भोसरी – च-होली मंडलाध्यक्ष नगरसेवक राजेंद्र लांडगे, चिंचवड स्टेशन – प्राधिकरण मंडलाध्यक्ष विजय सीनकर, पिंपरी दापोडी मंडलाध्यक्ष महेंद्र बाविस्कर, निगडी – चिखली मंडलाध्यक्ष महादेव कवितके, चिंचवड – किवळे मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे, सांगवी काळेवाडी मंडलाध्यक्ष विनोद तापकीर आदी उपस्थित होते.
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघातील पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी अमोल थोरात यांच्याकडे देण्यात आली. तसेच राजू दुर्गे पिंपरी विधानसभा, मोरेश्वर शेडगे चिंचवड विधानसभा, विजय फुगे भोसरी विधानसभेची जबाबदारी सोपविली आहे. तिघांच्या मार्गदर्शनाखाली सहा मंडलाध्यक्षानी मंडलाच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याकडून प्रत्येकी पन्नास अर्ज भरण्याची जबाबदारी विभागून दिली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी एक लिंक तयार केली असून काही अडचणी आल्या तर त्यासाठी विधानसभेनुसार ज्यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे मार्गदर्शन घेऊन जास्तीत जास्त अर्ज भरून घ्या, असे आवाहन शहराध्यक्ष आ. लांडगे यांनी केले आहे.














