न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. सप्टेंबर. २०२०) :- जनअधिकारी संघटनेतर्फे सामाजिक भान राखत साधेपणाने मोहरम साजरा करण्यात आला. यावेळी मौलाना शमशाद यांनी मोहरमचे महत्त्व सांगितले. यांनतर समाजबांधवांना सरबत आणि आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष माजिद शेख, उपाध्यक्ष अॅड. सुशिलकुमार डुमने, अॅड. बी.के. कांबळे, महिला अध्यक्ष सईदा शेख आदी उपस्थित होते.














