- नवीन विरोधी पक्षनेता कोण? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे पक्षाच्या ठरलेल्या धोरणानुसार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा आज बुधवारी (दि. २) रोजी ४ वा. राजीनामा दिला आहे.
काटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे आपल्या स्वीय सहाय्यकामार्फत राजीनामा पाठविला आहे. त्यांच्या जागी नव्या नेत्याची निवड करण्याची प्रक्रिया पक्षपातळीवर सुरु आहे.
या पदासाठी राष्ट्रवादीच्या माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समिती माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, विधी समिती माजी सभापती संतोष कोकणे हे इच्छुक आहेत. त्यांनी हे पद मिळावे यासाठी पक्षाकडे अर्ज केला आहे. त्यामुळे नवीन विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार कोणाची वर्णी लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














