न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी सात लाख ६१ हजार १६२ रुपये किमतीचे १६० टायर चोरून नेले. भोसरी येथे राजमाता उड्डाणपुलाजवळ बुधवारी (दि. २) चोरीचा हा प्रकार घडला.
प्रदीप सोमदत्त शर्मा (वय ३४, रा. मोशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी शर्मा यांनी त्याचा ट्रक बुधवारी पहाटे भोसरी येथील राजमाता उड्डाणपुलाजवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केला होता.














