न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- चोरट्यांनी शहरातून चार दुचाकी आणि एक रिक्षा चोरून नेली. याबाबत बुधवारी (दि. २) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले. नवीन राघव हेगडे (वय ३६, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी ५ ऑगस्ट रोजी एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपुलाखाली पार्क केली होती. अंकित घिशुलाल जैन (वय ३२, रा. ऑटो क्लस्टर, चिंचवड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी बुधवारी (दि. २) सकाळी दहाच्या सुमारास गवळीनगर, भोसरी येथील मारुती ट्रेडर्स समोर पार्क केली होती. भरदिवसा त्यांची दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली.
लखन महावीर पोपळघट (वय २७, रा. चहोली खुर्द, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी ३० ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या वडापाव सेंटर समोर पार्क केली होती. चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली. हा प्रकार सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आला.
ललित मंगीलाल ओसवाल (वय ४७, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी २५ ऑगस्ट रोजी सोमाटणे येथील हॉस्पिटलच्या गेट समोर पार्क केली होती. दयानंद व्यंकट शिंगे (वय ३२, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिंगे यांनी त्यांची रिक्षा ज्योतिबानगर, काळेवाडी येथील मंगल कार्यालयसमोर ३१ ऑगस्ट रोजी पार्क केली होती.














