न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या तळमजल्यावर पार्किंगच्या जागेत नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र अनधिकृत असून, त्याची परवानगी घेतली नसल्याचे पत्राद्वारे संबंधित नागरी सुविधा केंद्र चालकाला प्राधिकरणाने कळवले आहे.
मात्र, सध्या शाळा, महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांची प्रक्रिया सुरू असल्याने या पत्राबाबत सामान्यांतून संताप व्यक्त केला व जात आहे. दरम्यान, पत्राद्वारे प्राधिकरणाच्या जागेचा अनधिकृत वापर होत असल्याचे सध्याचे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी त्याबाबतचे पत्र सुविधा केंद्रचालकास दिले आहे. तसेच, या केंद्राबाबत प्राधिकरणाची कोणतीच परवानगी नसल्याचे त्यात नमूद केले आहे.














