न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन दिले आहे. कार्यवाहीकरिता हे निवेदन विनंती पत्रासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भरीव कामगिरी केली आहे. त्यांचे साहित्य सातासमुद्रापार गेले असून, रशियात त्यांचे साहित्य कमालीचे लोकप्रिय आहे. केवळ दीड दिवस शाळा शिकणाऱ्या आण्णा भाऊ साठेच्या कथा – कादंबऱ्यांवर अनेक चित्रपट निघाले. मात्र अशा प्रतिभावान लेखकाची शासनाकडून उपेक्षा होत आहे.
त्यांच्या शंभराव्या जयंती वर्षानिमित्त त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्याची मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी भाजपचे नेवासा तालुका अध्यक्ष नितीन दिनकर उपस्थित होते.














