न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- मावळ तालुक्यातील वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुचिता पानसरे यांची बदली होऊन त्यांची पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.
याबाबतचे आदेश अवर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी काढले. वडगाव – मावळ नगरपंचायतीमध्ये त्यांना केवळ दोन महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील भिवापूर ब कुही नगरपंचायतीमध्ये त्यांनी मुख्याधिकारी म्हणून काम केलेले आहे.