न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला मोर्चेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात वाढीव वीजबिले आणि खंडित वीजपुरवठा व अति उच्चदाबमुळे नागरिकांचे घरातील विदयुत उपकरणे यांचे होणाऱ्या नुकसानाबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफाळकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उन्नति सोशल फाउंडेशन अध्यक्षा उज्वला गणेश गावडे, महिला पदाधिकारी सोनम मोरे, अॅड. मुग्धा खान्देशी उपस्थित होत्या.
तसेच वायफाळकर यांनी निवेदनाची दखल घेत लवकरच नागरिकांना होणाऱ्या अडचणीचे निरसन करण्यात येईल, असे आश्वासनं दिले.















