न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- कोरोनाबाधित रुग्णांची खाजगी रुग्णालयांकडून आर्थिक पिळवणूक होऊ नये तसेच सर्वसामान्य जनतेला वेळ पडल्यास खासगी रुग्णालयात उपचार परवडले पाहिजेत, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने कोरोना तपासणी व उपचारांकरिता दर निश्चित केले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांकडून भरमसाठ रकमांची बिले वसूल करण्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.
रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आज (बुधवारी) पालिकेसमोर आंदोलन केले.
यात जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका उर्मिला काळभोर, अनंत को-हाळे, अनिता तुतारे, सरिता साने, रोमी संधू, ज्ञानेश्वर शिंदे, माधव मुळे, हरेश नखाते आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.















