- रस्त्यावर धुंकणा-या, मास्क न वापरणा-या नागरीकांवर दंडात्मक कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोरोना (कोविड १९) प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ” इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ३ मधील मोशी, च-होली, प्रभाग क्र. ४ दिघी बोपखेल, प्रभाग क्र. ७ भोसरी गावठाण परीसरात रस्त्यावर धुंकणा-या तसेच मास्क न वापरणा-या नागरीकांवर आज बुधवारी दंडात्मक कारवाई करणेत आली.
यात मोशी च-होली प्रभाग क्रमांक तीनमधील मास्क न वापरणाऱ्या सहा व्यक्तींवर तीन हजार रुपयांची तर, प्रभाग क्रमांक ४ मधील दिघी-बोपखेलमधील ९ व्यक्तींवर ४५०० रुपयांची, प्रभाग क्रमांक सात मधील भोसरी गावठाण हद्दीतील मास्क न वापरणाऱ्या एका व्यक्तीवर ५०० रुपयांची तर ३० थुंकणाऱ्या तीस व्यक्तींवर ४५०० रुपयांची अशा एकूण मास्क न वापरणाऱ्या १६ व्यक्तींवर तर, तीस थुंकणाऱ्या व्यक्तीवररील एकूण १२५०० रुपये एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईसाठी सहा. आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी बाळासो. खांडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार वरीष्ठ पोलिस इन्स्पेक्टर शंकर आवताडे, वरीष्ठ पोलिस इन्स्पेक्टर कुटे, पीएसआय तलवाडे, पोलिस हेड कॉ. घुमरे, यांच्याबरोबर क्षेत्रीय कार्यालयाचे महा.आरोग्याधिकारी राजेश भाट, मुख्य आगेय निरिक्षक अभिजित गुमास्ते, आरोग्य निरिक्षक राजू साबळे , चंद्रकात रोकडे, सुधीर बानमार, मुकादम रविंद्र जगताप, धनंजय गगावणे, कैलास यादव, रविन्द्र थोटा, श सोमनाथ तुपे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.















