न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. सप्टेंबर. २०२०) :- गणेशोत्सवात लोकप्रतिनिधी सर्वच मंडळांना वर्गणी देत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवा नेते परशुराम आल्हाट यांनी ‘ वर्गणी महाराष्ट्रासाठी ‘ हा विधायक उपक्रम हाती पिंपरी चिंचवडकरांसाठी हा उपक्रम आदर्शवत आहे, अशी भावना शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.
पिंपरी – चिंचवडमधील शिवसेना युवा नेते आल्हाट आणि मोशीतील सामाजिक कार्यकर्त्या रुपाली आल्हाट यांच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढाकाराने
वर्गणी महाराष्ट्रासाठी हा उपक्रम घेण्यात आला. त्यातून जमा झालेला निधी मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे जमा करण्यात येणार आहे. त्याचा धनादेश शिवसेना उपनेते आढळराव पाटील यांच्याकडे दिला.
कामगार नेते व सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद म्हणाले ‘ वर्गणी महाराष्ट्रासाठी ‘ या उपक्रमामुळे मुखमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत होणार आहे. कोरोना कालावधीत शासनाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील सर्व दानशूरांनी पुढे येऊन अशा उपक्रमाच्या माध्यमातून एक हात मदतीचा पुढे करावा. जेणेकरून अत्यावश्यक सेवेसाठी त्याची मदत होईल.
परशुराम आल्हाट म्हणाले की, मुख्यमंत्री सहायता निधीत खारीचा वाटा गणेशोत्सव मंडळांना वर्गणी न देता ती वर्गणी महाराष्ट्रासाठी द्यायची, असा संकल्प आम्ही केला होता.
यावेळी उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, रूपाली आल्हाट, युवा सेना जिल्हा समन्वयक सचिन मुटके, तुषार आल्हाट, चावरे व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.