- मात्र, गर्दी टाळण्याचे पोलिसांकडून आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. सप्टेंबर. २०२०) :- शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गेल्या आठवण्यात पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी नागरिकांची पोलीस आयुक्तालयात गर्दी होत आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकातून माहिती दिली. पिंपरी – चिंचवड तसेच पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र नागरिक पोलीस आयुक्त यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात गर्दी करीत आहेत.
वरिष्ठ अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. काही अडचणी आल्यास नागरिकांनी संबंधित अधिका-यांशी संपर्क साधावा. अत्यंत आवश्यक व निकडीचे काम असल्यास नागरिकानी ०२०-२०३४०५५५ या क्रमांकावर संपर्क साधून पूर्व परवानगी घेऊन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेण्यासाठी यावे, तसेच कोणतेही पुष्पगुच्छ आणून नये, असे आवाहन पत्रकातून केले आहे.