- पावणे तेराशेच्या जवळपास रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) रोजी १२६५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२७२ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात भोसरी (पुरुष ५२ वर्षे, पुरुष ७९ वर्षे, पुरुष ४१ वर्षे, पुरुष ६६ वर्षे), वाकड (पुरुष ७४ वर्षे, पुरुष ७१ वर्षे), थेरगाव (पुरुष ८०वर्षे, पुरुष ८७ वर्षे, पुरुष ३२ वर्षे ), संत तुकाराम नगर, पिंपरी (स्त्री ६२ वर्षे, पुरुष ५९ वर्षे ), मोशी (पुरुष ७० वर्षे), काळेवाडी (पुरुष ७७ वर्षे, पुरुष ६४ वर्षे), पिंपरी (पुरुष ६९ वर्षे,पुरुष ६८ वर्षे), चिंचवड (पुरुष ९० वर्षे, स्त्री ७० वर्षे, स्त्री ७७ वर्षे), सांगवी (पुरुष ४७ वर्षे, स्त्री ५४ वर्षे), दापोडी (पुरुष ३७ वर्षे), दिघी (स्त्री ६५ वर्षे, पुरुष ६९ वर्षे), वाल्हेकरवाडी (स्त्री ६० वर्षे), पिंपळे निलख (पुरुष ८० वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ४७ वर्षे), यमुनानगर (पुरुष ३५ वर्षे), येरवडा (पुरुष ५९ वर्षे, स्त्री ६६ वर्ष, पुरुष ५० वर्षे), कसबापेठ पुणे (पुरुष ५४ वर्षे), खारकुडी बु. (स्त्री ८० वर्षे), शिवणे (पुरुष ३६ वर्षे), खेड (स्त्री ५० वर्षे), हडपसर (पुरुष ५६ वर्षे), जुन्नर (स्त्री ८० वर्षे), कर्वे नगर पुणे (स्त्री ७८ वर्षे), सातारा (पुरुष ६८ वर्षे), चंदननगर (स्त्री ५९ वर्षे), लोणावळा (पुरुष ६६ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ६१२३१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४९९२३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १००८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















