- थुंकणाऱ्याकडून आजपर्यंत पालिकेने केली १७ लाखांची वसुली …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२०) :- कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुकल्यास आता १५० रुपयांऐवजी १ हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. त्यामुळे थुकीबहादरांना जबर आर्थिक चाप बसणार आहे. परिणामी, धुंकण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी तोंडाला मास्क लावण सक्तीचे केले आहे. मास्कन लावल्यास ५०० रुपये दंड आणि रस्त्यावर थूकल्यास १ हजार रुपये दंड करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी महापालिकेस दिल्या. कोरोनाचा वाढता प्रादुभाव लक्षात रस्त्यावर थुकणाऱ्या नागरिकांना घेऊन – आर्थिक भुर्दंड व्हावा, म्हणून दंडाची रक्कम १ हजार करावी, असा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी येत्या बुधवारी (दि. १६) होणाऱ्या स्थायी समितीसमोर ठेवला आहे. समितीच्या मंजुरीनंतर थुकीबहाद्दरांवर १ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
साडेपाच महिन्यांत ५ हजार थुंकीबहाद्दरांवर महापालिकेने कारवाई १ एप्रिलपासून सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत ५ हजार नागरिकांकडून प्रत्येकी १५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यांची एकूण रक्कम ७ लाख ५० हजार इतकी आहे. तर, मास्क न घालणाऱ्या ३ हजार ५०० जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्यात आले असून, ती एकूण रक्कम १७ लाख ५० हजार इतकी आहे.