- ७६० जणांना बाधा तर, २३ जणांचा मृत्यू; ४५९ जणांना आज डिस्चार्ज
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) रोजी ७६० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४५९ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात भोसरी (स्त्री ८० वर्षे), बिजलीनगर (पुरुष ५८ वर्षे), कासारवाडी (पुरुष ७१ वर्षे), जुनी सांगवी (स्त्री ७१ वर्षे), सिंधुनगर (स्त्री ५८ वर्षे), मोरेवस्ती चिखली (पुरुष ७८ वर्षे), जाधववाडी चिखली (पुरुष ७१ वर्षे), प्राधिकरण निगडी (पुरुष ४५ वर्षे), मोशी (पुरुष ७५ वर्षे), पिंपळे गुरव (पुरुष ५२ वर्ष, पुरुष ८५ वर्षे), पिंपळे निलख (स्त्री ७२ वर्षे), पिंपळे सौदागर (पुरुष ७२ वर्षे), पिंपरी (स्त्री ३५ वर्षे), नवी सांगवी (स्त्री ६५ वर्षे), काळेवाडी (पुरुष ७० वर्षे, पुरुष ४० वर्षे), आंबेगांव (पुरुष ७६ वर्षे), राजगुरुनगर (पुरुष ६१ वर्षे), कसबापेठ पुणे (स्त्री ७१ वर्षे), शिरवळ (पुरुष ७८ वर्षे), खेड (पुरुष ६० वर्षे), शिक्रापूर (पुरुष ५३ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ६४३८२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५३५९१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १०५६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















