न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेवकांचे कोरोनामुळे निधन होण्याचे सत्र सुरूच आहे. प्रभाग क्रमांक ४ चे भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचं बिर्ला हाॅस्पीटल येथे कोरोना उपचारादरम्यान आज सोमवारी दुःखद निधन झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख याचं कोरोनामुळे वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले. आता तिसरे नगरसेवक लक्ष्मण उंडे याचं कोरोनामुळे निधन झाले आहे. उंडे हे २०१७ च्या पालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर नगरसेवक पदी निवडून आले होते.


















