- शहरात केवळ साडेदहा हजार सक्रीय रुग्ण; तर ५५८५३ कोरोनामुक्त…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. १६ सप्टेंबर) रोजी ११०४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १०७४ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात चिंचवड (स्त्री ७८ वर्षे, पुरुष ६४ वर्षे, पुरुष ४५ वर्षे), चिखली (पुरुष ४० वर्षे), कोकणेनगर (पुरुष ५८ वर्षे), सांगवी (पुरुष ६४ वर्षे, पुरुष ७२ वर्षे), तळवडे (पुरुष ६८ वर्षे), पिंपरी (पुरुष ८१ वर्षे), संत तुकारामनगर, पिंपरी (पुरुष ८२ वर्षे), भोसरी (पुरुष ६५ वर्षे), दापोडी (स्त्री ६५ वर्षे), खेड (पुरुष ७३ वर्षे), मारुंजी (पुरुष ६० वर्षे), जुन्नर (पुरुष ४० वर्षे), लोहगाव (पुरुष ७१ वर्षे), कात्रज (पुरुष ३७ वर्षे), मावळ (पुरुष ३९ वर्षे), आंबेगाव (पुरुष ६२ वर्षे), चाकण (पुरुष ४३ वर्षे), कुरकुंडी (पुरुष ६१ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ६६४८३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५५८५३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १०७७ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.















