न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- पुढील शिक्षणासाठीचा खर्च करा असे सांगणाऱ्या अल्पवयीन मुलीचा वडिलांनी विनयभंग केला, तसेच मुलीच्या आईला धमकी दिली. मोरवाडी, पिंपरी येथे सोमवारी (दि. १४) दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी १६ वर्षीय पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या वडिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी त्याच्या ऑफिसमध्ये असताना फिर्यादी अल्पवयीन मुलगी तेथे गेली.
पुढील शिक्षणाचा खर्च करण्यासठी तिने सांगितले. त्यावेळी आरोपी तिच्या अंगावर धावून आला. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर तेथून निघून जात असताना फिर्यादी मुलीच्या आईला धमकी दिली.