न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- महापालिकेने शहरातील १८ कोविड केअर सेंटर खासगी रुग्णालय व संस्थांना चालविण्यास दिले आहेत. त्यासाठी तीन महिन्यांचा खर्च १९ कोटी ४९ लाख २२ हजार इतका आहे. सदर प्रस्ताव आठवड्यासाठी थांबविला असून तपासणीसाठी समिती नियुक्तीचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने खासगी संस्थांना कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी देण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यानुसार सामाजिक संस्थांना आवाहन केले होते. अध्यक्ष संतोष लोंढे म्हणाले, ” कोविड सेंटरबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे या सेंटरची पाहणी करण्यासाठी विभागस्तरीय समिती नियुक्ती करण्यात येणार असून, पाहणी केल्यानंतर खासगी कोविड सेंटरच्या बिलांचा निर्णय घेण्यात येईल.