- साफ-सफाई कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करून केली कृतज्ञता व्यक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी स्थायी समिती अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका ममताताई विनायक गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी पुढाकार घेतला.
वाकड-पिंपळे निलख परिसरात सेवा सप्ताह आयोजित करून कोरोना कालावधीमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या साफसफाई अधिकारी व कर्मचारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, त्यांचा सत्कार करण्यात आला.महिला कर्मचारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या परिसराची स्वच्छता नागरिकांच्या समस्या करण्याकरिता त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
ममताताई विनायक गायकवाड म्हणाल्या की “आपल्या सर्वांचे या कोरोना काळात लोकांच्या सेवेकरिता योगदान सर्वात मोठे आहे. आपल्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता व प्रोत्सहीत करण्याकरिता आजच्या दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी मी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त करते व याहीपुढे अशीच नागरिकांची सेवा आपल्या हातून घडो हीच सदिच्छा व्यक्त करते.”
दरम्यान सफाई कर्मचारी सपना अडसूळ यांचा वाढदिवस ममताताई, विनायक गायकवाड, सफाई कर्मचारी व अधिकाऱ्यांचा वतीने साजरा करण्यात आला.















