न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा प्रारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज करण्यात आला. सांगवी येथे प्रत्यक्ष गृहभेट घेवून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक संतोष कांबळे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील़, अति. आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैदयकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सांगवी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. विनया आंबेडकर, सहा.आयुक्त अण्णा बोदडे, संदिप खोत, सिनेट सदस्य संतोष ढोरे आदी उपस्थित होते.
कोविड १९ नियंत्रणासाठी तसेच म्रत्यूदर कमी करण्यासाठी व कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्याची सुचना राज्य शासनाने दिली असून त्या अंतर्गत गृहभेटी देवून नागरिकांना आरोग्य शिक्षण व त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, या मोहिमेला आज पिंपरी चिंचवड शहरात प्रारंभ झाला.
त्याचप्रमाणे, & quot;माझे कुटुंब -माझी जबाबदारी" या कार्यक्रमाचा प्रभाग क्र. १७ शिवनगरी, बिजलीनगर येथून ही आज शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमासाठी गृहभेट देवून तपासणी करणाऱ्या तीन सदस्यीय टीम नेमण्यात आल्या असून या टीमद्वारे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या कुटुंबाची तपासणी करून अभियानाची सुरुवात झाली. "माझे कुटुंब माझी जबाबदारी"ही मोहीम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे.
या मोहिमेसाठी नागरिकांनी स्वतः हुन पुढाकार घेऊन प्रतिसाद द्यावा. तसेच, आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबांची तपासणी करून महापालिकेच्या टीम ला सहकार्य करावे, असे आवाहन सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी नागरिकांना केले.
या कार्यक्रमावेळी, महापौर उषा उर्फ माई ढोरे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशांत जोशी, डॉ. सुनील जॉन, डॉ. विनादेवी गंभीर, डॉ. किशोरी नलावडे, डॉ. प्रियांका सर्वज्ञ, आदेश नवले, योगेश चिंचवडे, प्रमोद चौधरी, शंकर पाटील, प्रदीप पटेल, कैलास रोटे, वसंत नारखेडे, संजय माळी आदी उपस्थित होते. तसेच, भोसरी येथे स्थायी समिती सभापती संतोष अण्णा लोंढे यांच्या उपस्थितीत ही मोहिम सूरू करण्यात आली. यावेळी अति. वैदयकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैदयकीय अधिकारी डॉ. शैलेजा भावसार, सहा. आयुक्त बाळासाहेब खांडेकर आदी उपस्थित होते.














