- पिं. चिं. शहरातील ११२२ रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. २१ सप्टेंबर) रोजी ६५५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ११२२ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज आकुर्डी (पुरुष ७५ वर्षे), भोसरी (पुरुष ५५ वर्षे, पुरुष ७३ वर्षे), थेरगांव (पुरुष ३९ वर्षे, पुरुष ७० वर्षे, पुरुष ५४ वर्षे), नेहरुनगर (पुरुष ६३ वर्षे), खराळवाडी (स्त्री ३५ वर्षे), प्राधिकरण, निगडी (पुरुष ७० वर्षे), सांगवी (पुरुष) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे चाकण (पुरुष ६१ वर्षे, पुरुष), कर्वेनगर (पुरुष ७३ वर्षे), वडगांव शेरी (स्त्री ४९ वर्षे), धायरी (पुरुष ७४ वर्षे), वारजे माळवाडी (स्त्री ४५ वर्षे, पुरुष ७५ वर्षे), खराडी (स्त्री ५६ वर्षे), आंबेगांव (पुरुष ७० वर्षे), खेड (पुरुष १९ वर्षे), सोलापूर (पुरुष ६४ वर्षे), कराड (पुरुष ५२ वर्षे), जुन्नर (पुरुष ७५ वर्षे, पुरुष), हडपसर (पुरुष ५४ वर्षे), शिंदेवाडी मुळशी (पुरुष), वारजे (पुरुष), पुणे (पुरुष ४० वर्षे, स्त्री), देहुरोड (पुरुष) येथील रहिवासी आहेत. आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील कळविलेल्या ११ मृत रुग्णांपैकी आज ०५ आणि यापुर्वी परंतु आज अहवाल प्राप्त झालेले मृत ०६ आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७०८२७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६१०९० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ११५३ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.