न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२०) :- चिंचवडेनगर प्रभागात विकासकामांमुळे रस्त्यांची दुरावस्ता झाली आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण झालेला रस्ता उखडलेला आहे. अशातच साई मंदिरापासून दगडोबा चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकरखाली असणारे चेंबरचे झाकण अर्धवट अवस्थेत उघडे पडले आहे.
अगदी रस्त्याच्या मधोमध चेंबरच्या अर्धवट उघड्या झाकणावर लाकडी दांडके उभे करून ठेवल आहे. त्या दांडक्याला पांढऱ्या आवरणाने गुंडाळलेले आहे. या रस्त्यावर मोठी रहदारी असते. मोठा पाउस पडल्यावरदेखील या ठिकाणी पावसाच्या पाण्याचे मोठे डबके साचते. त्यामुळे रात्री-अपरात्री अपघात होण्याची शक्यता आहे.















